श्रद्धा कपूरने शेअर केला बालपणीचा फोटो, लिहिले की, जेव्हा माझे सशासारखे होते दात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:11 IST2020-04-23T18:11:16+5:302020-04-23T18:11:16+5:30

लॉकडाउनमध्ये श्रद्धा कपूरने बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा माझे दात सशासारखे होते.
सध्या सर्व कलाकार चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
काही कलाकार सोशल मीडियावर जेवण बनवण्यापासून साफसफाई करतानाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.
काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर जुने फोटो शेअर केले आहेत.
श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
यापूर्वीही श्रद्धाने कित्येक वेळा तिचे जुने फोटो शेअर केले आहेत.
आतापर्यंत या फोटोला 2.5 मिलियनहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.