Photos : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अख्तर...! शिबानी व फरहानचं लग्नानंतर रोमॅन्टिक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:28 PM2022-02-27T17:28:25+5:302022-02-27T17:34:21+5:30

Shibani Dandekar Farhan Akhtar Photos : शिबानी दांडेकर आता मिसेस अख्तर झाली आहेत. सध्या ती तिच्या लग्नाबरोबरच शिबानी तिच्या फोटोंमुळेही खूप चर्चेत आहे.

लग्नानंतर फरहान अख्तर व शिबानी दांडेकर फुल्ल एन्जॉय करताना दिसत आहेत. या लग्नाचा थाट तुम्ही पाहिलाच असेल. आता दोघांचे रोमॅन्टिक अंदाजातील फोटोही समोर आले आहेत.

लग्नानंतर या न्यूलीमॅरिड कपलने एक रोमॅन्टिक फोटोशूट केलं आहे. या फोटोतील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

फरहान अख्तरसोबतचं शिबानीचं हे पहिलं रोमॅन्टिक फोटोशूट आहे. शिबानीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शिबानी व फरहान एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. दोघांनीही किलर पोझ दिल्या आहेत.

काही फोटोंमध्ये तिने एकटीनेही पोझ दिल्या आहेत. कटआऊट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये शिबानी प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.

न्यूड लिप ग्लॉस, लाईट आयशॅडो, आयलाइनर, मस्कारासोबत तिचा लूक आणखीच खुलून आला आहे.

शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर 19 फेब्रुवारी रोजी दोघं विवाह बंधनात अडकले.

विशेष म्हणजे दोघांनी हिंदु किंवा मुस्लीम पद्धतीनं विवाह न करता लग्नाची वचनं घेत आणि रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.