OMG!! शहनाजने सर्वांसमोर सलमानला मारली घट्ट मिठी, बाजूला उभ्या शेराची रिअ‍ॅक्शन बघितली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 03:31 PM2022-05-04T15:31:46+5:302022-05-04T15:49:45+5:30

Shehnaaz Gill trolled for hugging kissing Salman Khan : सलमानची बहिण अर्पिता खान हिनं होस्ट केलेल्या ईद पार्टीत बडे बडे कलाकार दिसले. पण चर्चा झाली ती शहनाजची. का? तर तुम्हीच बघा

शहनाज गिल जिथे जाईल, तिथे तिची चर्चा होते. काल ती अर्पिता खानच्या ईद पार्टीला पोहोचली. मग काय, इथेही तिचीच चर्चा झाली.

खुद्द भाईजान सलमान खान या पंजाबच्या कतरिना कैफचे सगळे लाड पुरवताना दिसला. यावेळी दोघांचीही क्यूट बॉन्डिंग दिसून आली.

आली तशी शहनाजनं सलमान कडकडून मिठी मारली, त्याला किस केलं. याचे फोटो व्हायरल झालेत आणि सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली.

काहींना शहनाजचा क्यूट अंदाज आवडला. पण काहींनी यावरून तिला ट्रोल केलं. काहींनी भाईजानचा बॉडीगार्ड शेराची रिअ‍ॅक्शन पाहून तिची खिल्ली उडवली.

शहनाज व सलमान पापाराझींना पोझ देत असताना भाईजानच्या मागे उभा असलेला शेरा त्या दोघांकडे टक लावून बघत होतो. काहीशा गंभीर चेह-यानं तो उभा दिसला. लोकांनी यावरून मजा घेतली.

शेराला शहनाजचे इरादे काही पटलेले दिसत नाहीत, अशी कमेंट अनेक युजर्सनी यावर केली. अरे शेराकडे जरा बघा, म्हणत अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या.

काही युजर्सनी शहनाजला ट्रोल केलं. अरे सलमानला किती चिपकणार, या मुलीला आत्मसन्मान आहे की नाही, असं एका युजरने तिला ट्रोल करताना लिहिलं.

सांभाळ स्वत:ला सना..., अरे ही काय करतेय? मस्करी एका मर्यादेपर्यंतच बरी वाटते, अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या.काहींना मात्र शहनाज व सलमानची बॉन्डिंग चांगलीच आवडली. अनेकांनी शहनाजला क्यूट, कूल म्हणत, तिचं कौतुक केलं.