पत्नी गौरी आणि मुलांसह आलिशान घरात राहतो किंगखान; पाहा शाहरुख खानच्या मन्नतचे Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 14:46 IST2022-11-02T14:17:42+5:302022-11-02T14:46:03+5:30
6 हजार स्क्वेअर फूटांचा विस्तीर्ण जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्याचे इंटेरिअर करायला गौरी खानला तब्बल ४ वर्षे लागली.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान 2 नोव्हेंबरला त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करणार आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा त्याच्याकडे केवळ 300 रुपये होते. त्यावेळी त्याला रहायला घर नव्हतं. पण आज तो 200 कोटींच्या एका आलिशान घराचा मालक आहे.
शाहरुख खान आज जितका फेमस आहे तितकाच फेसम त्याचा मन्नत हा बंगला आहे.
हा फोटो मन्नतच्या बाहेरचा आहे. बाहेरुन हा बंगला इतका सुंदर दिसतो तर आतून किती सुंदर असेल याचा विचार करा.
हे आहे शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरीचं बेडरुम. ही रुम फोटोत इकती सुंदर दिसतीये तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल.
ही शाहरुखची ड्रॉइंग रुम आहे. ही रुम कोणत्याही रॉयल पॅलेसपेक्षा कमी नाही.
या बंगल्यातही शाहरुखने आपल्यासाठी एक छोटं ऑफिस तयार करुन घेतलं आहे.
या बंगल्याच्या इंटेरिअरची सगळी जबाबदारी शाहरुखची पत्नी गौरीने घेतली आहे.या बंगल्याच्या इंटेरिअर करण्यासाठी गौरीला चार वर्षे लागली.
जगातल्या विविध भागातून आणलेल्या अनेक महागड्या वस्तू या घरात शाहरुखने सजवल्या आहेत.
साधारण 6 हजार स्क्वेअर फूट जागेवर हा बंगला बांधण्यात आला असून यात जिम, बॉक्सिंग, रिंग, ऑफिल, स्वीमिंग, मनोरंजानाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.