याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा; शाहरुख खानही 'या' गोष्टीला मानतो, वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 18:25 IST2025-07-27T18:00:57+5:302025-07-27T18:25:56+5:30

शाहरुख खान प्रत्येक चित्रपटात नेमानं करतो 'ही' गोष्ट!

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून शाहरुखचे असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

या चित्रपटांच्या यशामागे त्यांची कठोर मेहनत तर नक्कीच आहे. पण, अशी एक गोष्ट आहे, जी केल्यानं चित्रपट हीट होतो, असं शाहरुख मानतो. त्याच्या मते जेव्हा तो चित्रपटात ती गोष्ट करतो, तेव्हा तो चित्रपट नक्कीच हिट होतो.

पण, शाहरुख खान हा अंधश्रद्धेवरही (Shah Rukh Khan Superstition) विश्वास ठेवतो.

हो, ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण शाहरुख खान मानतो की जेव्हा तो आपल्या चित्रपटात "धावतो". तेव्हा तो चित्रपट हमखास हिट होतो.

कोयला सिनेमादरम्यान एका bts व्हिडीओमध्ये शाहरुख स्वतः म्हणाला होता, "'डर' मध्ये सनी देओलपासून पळालो, तो हिट झाला. 'करण अर्जुन' मध्ये सलमाननं 'भाग अर्जुन भाग' म्हटलं, तोही हिट झाला. 'दिलवाले' मध्ये मी मुलीच्या मागे धावलो, तोही ब्लॉकबस्टर ठरला. त्यामुळे आम्ही हा ट्रेंड सुरू ठेवला आहे. म्हणून चित्रपटात मी खूप धावतो – कधी कुत्र्यांच्या मागे, कधी ट्रेनच्या, कधी खलनायकांच्या मागे"

हेच नाही तर शाहरुखचा ५५५ क्रमांकावर खूप विश्वास आहे. त्यांच्या सर्व वाहनांच्या नंबरप्लेट पाहून तुम्हीही यावर विश्वास ठेवाल. त्याला वाटते की, हे आकडे त्याचे नशीब पालटवू शकतात.

त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'चेन्नई एक्सप्रेस'च्या पोस्टर शूटसाठी त्याने जी बाईक चालवली होती, त्या बाईकच्या नंबर प्लेटवर सुद्धा ५५५ नंबर होता. ज्याप्रमाणे सामान्य लोक यश व आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टी करतात, त्याला बॉलिवूड कलाकारही अपवाद नाहीत.