Shahid Kapoor : बायकोच्या 'या' 2 वाईट सवयींना वैतागलाय शाहिद कपूर तर मीरा म्हणते, "तुला मी सरळ करणारच"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:35 PM2023-06-06T13:35:24+5:302023-06-06T14:04:28+5:30

Shahid Kapoor And Mira Rajput : शाहिद कपूरने मीराच्या अशाच सवयींचा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो खूप वैतागला आहे.

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या सर्व महिला फॅन्सची मनं दुखावली होती. शाहिद आणि मीराचा विवाह सोहळा 7 जुलै 2015 रोजी झाला होता. या वेडिंग फंक्शनमध्ये फक्त कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.

शाहीद आणि मीराला आता दोन गोड मुलं आहेत. असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा शाहिदने मीरावर कौतुकाचा वर्षाव केला. तिचं भरभरून कौतुक केलं. त्यांचं बोलणे ऐकून अनेकदा असं वाटतं की दोघेही 'मेड फॉर इच अदर' असेच आहेत.

पती-पत्नीमधलं नातं हे खास असतं. पण एकमेकांच्या अशाही काही चांगल्या वाईट सवयी असतात, ज्या काही वेळा त्रासदायक ठरू शकतात. आता शाहिद कपूरने मीराच्या अशाच सवयींचा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो खूप वैतागला आहे.

शाहिद कपूरने एका मुलाखतीत मीराच्या सर्वात त्रासदायक सवयीबद्दल सांगितलं. जेव्हा त्याला मीराची एक अशी सवय सांग जी तुला खूप त्रास देते असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने मीराच्या झोपण्याच्या सवयीबद्दल मोठा खुलासा केला.

शाहिद म्हणाला की, मीरा सकाळी उठत नाही आणि सकाळी 9 वाजताही तिला उठवण्याचा प्रयत्न करत असेन तर ती कुरकुर करत राहते. त्याने अजून एक तक्रार केली आहे. ती म्हणजे मीरा त्याला कोणतेही श्रेय देत नाही. याचा त्याला राग येतो.

"तुला मी सरळ करूनच राहीन" असं देखील मीरा शाहिद कपूरला म्हणते. यानंतर शाहिद कपूरने पत्नी मीराचं भरभरून कौतुक करण्यास सुरुवात केली आणि तिच्याबद्दल अनेक चांगल्या गोष्टीही सांगितल्या.

तो म्हणाला की, मीरा जशी आहे त्यावर त्याचं खूप प्रेम आहे. ती खरं तर खूप कणखर, प्रामाणिक, अतिशय स्पष्ट आणि खरी आहे. आजकाल या गोष्टी फार दुर्मिळ होत असल्याचेही शाहिदने सांगितले.

शाहिद कपूर म्हणाला, "ती खूप सुंदर आहे, तिचे हसणं सर्वात सुंदर आहे, ती खूप बुद्धिमान आहे. पण ती खूप छान आणि खूप खरी व्यक्ती आहे आणि असं फार कमी असतं". एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे इंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहेत. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मुलगी मीशा कपूर आणि मुलगा झैन कपूर. शाहिदचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'ब्लडी डॅडी' 9 जून रोजी OTT वर प्रदर्शित होत आहे.

शाहिद कपूर सध्या 'ब्लडी डॅडी' (bloody daddy) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये पहिल्यांदाच शाहिद एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला. या सिनेमासाठी शाहिदने तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी शाहिदनेच मौन सोडलं असून त्याने नेमकं किती मानधन घेतलं हे सांगितलं.

ब्लड डॅडीच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एका रिपोर्टरने शाहिदच्या त्याच्या मानधनाविषयी प्रश्न विचारला. या चित्रपटासाठी तू 40 कोटी फी घेतलीस हे खरे आहे का? असा प्रश्न शाहिदला विचारला. त्यावर, चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मजेशीर उत्तर दिलं.

तुम्ही कमीच रक्कम सांगितलीत, असं अली अब्बास जफर म्हणाले. परंतु, शाहिदने या प्रश्नाचं उत्तरं देणं शिताफीने टाळलं. त्याने या प्रश्नावर होकारही दिला नाही आणि नकारही. पण, जर एवढी रक्कम देत असाल तर मी कोणत्याही सिनेमात काम करेन, असं तो म्हणाला.