Shahid Kapoor : मुलांसाठी करियर सोडलं, लग्नानंतर कुटुंब सांभाळलं; शाहिद कपूरने केलं पत्नीचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:59 IST2025-01-25T16:49:22+5:302025-01-25T16:59:54+5:30

Shahid Kapoor And Mira Rajput : अभिनेता शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्यांना आता दोन गोड मुलं देखील आहेत.

शाहिद आणि मीरामध्ये असलेलं प्रेम आणि स्पेशल बाँड नेहमीच चाहत्यांचं मन जिंकून घेतो. ते एकमेकांवर भरभरून प्रेम करताना दिसतात.

शाहिदने आता आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की, "पत्नी मीराने आपल्या मुलांसाठी करियर मागे सोडलं होतं. त्यामुळेच मला तिचा अभिमान वाटतो."

"माझं असं म्हणणं आहे की, मीराची स्वत:ची एक पर्सनॅलिटी आहे आणि माझी एक पर्सनॅलिटी आहे."

"मीराने खूप साऱ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. तिने एक खूप स्ट्राँग निर्णय घेतला तो म्हणजे आधी मुलं आणि नंतर करियर पुढे नेणं."

"आमची मुलं आता थोडी मोठी झाली आहेत. त्यामुळे मीराकडे आता तिच्या स्वत:साठी वेळ आहे."

"मीराला आई म्हणून जे काही करायचं होतं ते तिने केलं आहे. कुटुंब सांभाळलं आता हळूहळू ती थोडी फ्री होत आहे."

"तिला जे काही हवं ते ती आता करत आहे. मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो आणि मी तिला सपोर्ट करत असतो."

"मीरा नेहमीच माझ्यासाठी एक चांगली मैत्रीण, पार्टनर आणि सपोर्ट सिस्टम म्हणून राहिली आहे. आता माझी वेळ आहे."

"मी नेहमीच तिच्यासोबत असेन" असं म्हणत शाहिद कपूरने आपल्या पत्नीचं खूप कौतुक केलं आहे.