Shahid Kapoor : "मी फक्त एकदाच प्रेमात पडलो, बाकी सर्व बकवास आहे, गेट आऊट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:55 IST2025-03-10T15:49:55+5:302025-03-10T15:55:14+5:30

Shahid Kapoor : एका शोमध्ये शाहिद कपूरला तू किती वेळा कोणाच्या प्रेमात पडला आहेस? असा प्रश्न विचारला.

अभिनेता शाहिद कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे.

फराह खानने एका शोमध्ये शाहिद कपूरला तू किती वेळा कोणाच्या प्रेमात पडला आहेस? असा प्रश्न विचारला.

शाहिदने फक्त एकदाच असं उत्तर दिलं आहे. "माझं लग्न झालं आहे फराह, तुला नेमकं काय करायचं आहे?" असा तिलाच प्रश्न विचारला.

फराहने यावर "आय लव्ह मीरा आणि मला माहित आहे की ती हे समजून घेईल" असं म्हटलं आहे.

"मी फक्त एकदाच प्रेमात पडलो, बाकी सर्व बकवास आहे, गेट आऊट"

"मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप खूश आहे" असं अभिनेत्याने म्हटलं आहे.

शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केलं आहे. शाहिद मीरापेक्षा १४ वर्षांनी मोठा आहे.

शाहिद आणि मीराला दोन गोड मुलं देखील आहे. अभिनेता नेहमीच मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.