शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 07:55 PM2023-03-21T19:55:15+5:302023-03-21T19:58:20+5:30

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा चित्रपट 'पठाण' २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

पठाण चित्रपट रिलीजच्या ७ आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ने शाहरुख खानच्या पठाणच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'पठाण' २२ मार्चला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्राइम व्हिडिओ इंडियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर पठाणचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाची रिलीज डेट लिहिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही हवामानात गोंधळाची स्थिती पाहत आहोत, शेवटी पठाण येतो आहे! #PathaanOnPrime, २२ मार्च हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये. (फोटो: इंस्टाग्राम)

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'ने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)