पाहा सारा अली खानचा स्टनिंग अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-23T08:51:43+5:302018-06-27T20:02:03+5:30

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटात झळकणार असून, साराचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. या चित्रपटामुळे सारा भलतीच चर्चेत आली असून, सुशांतदेखील तिचे कौतुक करताना थकत नसताना दिसत आहे. मात्र या चित्रपटासाठी सारा घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. ती तिच्या लूकबरोबरच फिगरवरही प्रचंड लक्ष देऊन आहे. यासाठी ती नित्यनियमाने जिममध्ये जाणे पसंत करते. सारा नुकतीच जिमच्या बाहेर आली असता, तिचा स्टनिंग लूक कॅमेºयात कैद झाला. पाहा तिचे फोटो!