Anushka-Virat House : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं घर आतून कसं दिसत पाहिलंत? पाहा घराचे Inside photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:30 IST2022-11-18T12:40:56+5:302022-11-18T19:30:17+5:30
Anushka-Virat House :अनुष्का आणि विराट कोहली राहतात 35व्या मजल्यावर, तिथून दिसते नयनरम्य मुंबई.

Anushka-Virat House : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर तिची मुलगी आणि पतीसोबत क्वॉलिटी टाईप स्पेंट करते आहे. पाहुया त्यांच्या प्रशस्त घराची झलक.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे हे आलिशान घर सी-फेसींग आहे. जे मुंबईच्या पॉश भागात आहे.
अनुष्का आणि विराटचे हे घर ओंकार इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आहे. लग्नानंतर दोघेही जिथे शिफ्ट झाले होते.
अनुष्का आणि विराटचा हा सुंदर फ्लॅट 5 बेडरूम आहे. ज्याची सजावट अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. यासोबतच येथून समुद्राचे नयनरम्य दर्शन होते.
अनुष्काने तिच्या घराला व्हाइट पेंट दिला आहे. यासोबतच घरात लाकडी फ्लोअरिंगही करण्यात आले आहे. जे घराला सुंदर बनवत आहे.
घराचा बाल्कनी एरिया खूप प्रशस्त आहे. जिथे बसण्यासाठी खुर्चीही आहे. तसेच येथून मुंबईचे सुंदर नजारा दिसते.
अनुष्काने आपल्या राजकन्येसाठी घरात एक प्ले एरियाही बनवला आहे. जिथे विराट वामिकासोबत खेळताना दिसत आहे. या घराची किंमत सुमारे 34 कोटी आहे.
घरातील हा अनुष्काचा आवडता कोपरा आहे. जिथे अभिनेत्री अनेकदा फोटोशूट करताना दिसत आहे.
प्रेग्नेंसीमुळे अनुष्काने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आता ती 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून लवकरच कमबॅक करणार आहे.