PHOTOS: कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आता आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 05:07 PM2020-10-07T17:07:46+5:302020-10-07T17:08:55+5:30

हरियाणाची सुपरस्टार्स आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी डान्सिंग क्वीन सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते. (Photo Instagram)

4 ऑक्टोबरला सपनाने एका गोंडस बाळाला जन्म झाला. सपनाने जानेवारीत महिन्यात बॉयफ्रेन्ड वीर साहूसोबत सीक्रेट मॅरेज केले. (Photo Instagram)

वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे.(Photo Instagram)

आज सुपरस्टार असलेली सपना चौधरीने कधीकाळी वडिलांच्या औषधांसाठी पैसे नसल्यामुळे घर गहाण ठेवले होते. (Photo Instagram)

3100 रुपयांसाठी ती डान्सचे शोज करायची. पण वेळ इतकी ताकदवान असते की आज ती लग्झरीस लाईफस्टाइल जगते आहे. (Photo Instagram)

आज सपना एका शोसाठी जवळपास 2 ते 3 लाख घेते आणि महिन्यातून 22 ते 25 शोज करते. (Photo Instagram)

आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात.(Photo Instagram)