एका तासासाठी लाखो रुपये चार्ज करते सपना चौधरी; स्टेज शोचं मानधन ऐकून येईल चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:04 PM2022-08-16T16:04:03+5:302022-08-16T16:06:38+5:30

Sapna choudhary: देशासह विदेशात डान्स शो करणारी सपना एका स्टेज शोसाठी प्रचंड मोठं मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

हरयाणवी डान्सर सपना चौधरी आज प्रत्येक व्यक्तीला परिचित आहे.

आपल्या डान्स स्टाइलमुळे सपनाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच बिग बॉस या कार्यक्रमातही तिला विशेष लोकप्रियता मिळाली.

वयाच्या १४ व्या वर्षी नाईलाजाने सपनाने डान्स करायला सुरुवात केली. मात्र, आज याच डान्समुळे ती जगभरात ओळखली जाते.

देशासह विदेशात डान्स शो करणारी सपना एका स्टेज शोसाठी प्रचंड मोठं मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

सपना साधारणपणे ३ तासांचा स्टेज शो करते. मात्र, या तीन तासांसाठी ती लाखो रुपये चार्ज करते.

सपना एका स्टेज शो साठी साधारणपणे २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते.

विशेष म्हणजे सपना एका तासाच्या कार्यक्रमासाठी २ते ३ लाख रुपये फी घेत असल्याचं सांगण्यात येतं.

सपना केवळ स्टेज शो नव्हे तर म्युझिक अल्बममधूनही कमाई करते.यात एका गाण्यासाठी ती ५० लाख रुपये घेते.