Samantha Ruth Prabhu: या गंभीर आजाराशी झुंज देतेय समंथा, हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 18:13 IST2022-10-29T17:49:41+5:302022-10-29T18:13:08+5:30
Samantha Ruth Prabhuच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचे सांगितले.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या यशोदा चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, यादरम्यान चित्रपटसृष्टीसाठी आणि अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
समांथाने नुकतीच तिच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपटेड दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचे सांगितले. (फोटो इन्स्टाग्राम)
हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
समांथाने सांगितले की तिला मायोसायटिस (Myositis)नावाच्या आजाराने ग्रासले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
समंथाने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, 'यशोधाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया जबरदस्त होती. (फोटो इन्स्टाग्राम)
तुम्हा सर्वांचं माझ्यावर असलेले हे प्रेम मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचे बळ देते.(फोटो इन्स्टाग्राम)
काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस असल्याचं निदान झाले. त्यातून बरे झाल्यानंतर मला याबद्दल बोलायचे होते परंतु याला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मी यातून लवकरच पूर्ण बरा होईन असा विश्वास डॉक्टरांना आहे. मी काही चांगले दिवस आणि काही वाईट दिवस पाहिले. मी तुमच्यावर प्रेम करते.. ही वेळ सुद्धा निघून जाईल.'(फोटो इन्स्टाग्राम)
समंथाच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
अभिनेत्री श्रिया सरन, राशी खन्ना, नंदू रेड्डी, सुष्मिता कोनिडेला आणि इतरांनी तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या हजारो चाहत्यांनीही कमेंट करून तिला धीर दिला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)