सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील 'जी रहे थे हम' गाण्याचा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:08 IST2023-03-20T18:04:08+5:302023-03-20T18:08:52+5:30
बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खान(Salman Khan)च्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज होणार आहे.

बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खान(Salman Khan)च्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील 'जी रहे थे हम' या पुढील गाण्याचा टीझर व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या रोमँटिक गाण्यात सलमान अभिनेत्री पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे 'जी रहे थे हम' हे गाणे सलमान खानने गायले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
'जी रहे थे हम' या गाण्याचा टीझर शेअर करत सलमानने या गाण्याच्या रिलीजच्या तारखेचीही माहिती दिली. हे गाणे उद्या म्हणजेच २१ मार्च रोजी रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
'जी रहे थे हम' हे गाणे 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील तिसरे गाणे आहे. याआधी 'नईयो लगदा' आणि 'बिल्ली बिल्ली' ही गाणी रिलीज झाली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फरहाद सामजी दिग्दर्शित, किसी का भाई किसी की जान या वर्षी ईदला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)