कुठे गायब झालीये 'तेरे नाम'ची निर्जरा; बॉलिवूडपासून दूर होताच झाली प्रचंड बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:28 IST2023-03-22T16:19:21+5:302023-03-22T16:28:32+5:30
Bhumika chawla: भूमिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा तेरे नाम हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला.
या सिनेमात सलमानला जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम अभिनेत्री भूमिका चावला हिला मिळालं.
या सिनेमात भूमिकाने निर्जरा या सालस, गुणी मुलीची भूमिका साकारली होती.
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. परंतु, त्यानंतर भूमिकाने बॉलिवूडपासून फारकत घेतली.
या सिनेमाची लोकप्रियता पाहता भूमिका बॉलिवूडमध्ये आणखी नाव कमावेल असं वाटत होतं. परंतु, तिने बॉलिवूडमधून काढता पाय घेत साऊथ सिनेमांची वाट धरली.
भूमिका चावलाने 'तेरे नाम' नंतर 'रन', 'सिलसिला', 'दिल ने जो भी कहा' सारख्या चित्रपटात काम केलं. मात्र, यात तिच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही.
भूमिका सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते.
विशेष म्हणजे तेरे नाममध्ये दिसलेली साधीभोळी निर्जरा खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे.
भूमिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर भूमिका चावलाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. त्यानंतर तिने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपट केले.
भूमिका आज दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.
काही वर्षांपूर्वी सुशांतच्या एम.एस धोनी. द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. तिने या सिनेमात सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.