'कुठून पकडून आणलंस याला?', आयुषला पहिल्यांदा बघताच सलमानने अर्पिताला विचारलेला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:41 PM2024-04-12T16:41:48+5:302024-04-12T16:47:56+5:30

सलमान खान लाडक्या बहिणीचं लग्न आयुषशी लावून देण्यास कसा तयार झाला?

सलमान खानची बहीण अर्पिता (Arpita Khan) ही त्याची अत्यंत लाडकी बहीण असल्याचं कायमच बोललं जातं. अर्पितासाठी सलमान काहीही करु शकतो. तिच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कायमच त्तपर असतो.

अर्पिता खानने 2014 साली आयुष शर्मासोबत (Aayush Sharma) लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. मात्र सर्वांना हा प्रश्न पडतो की अर्पिता आणि आयुषचं नक्की कधी जमलं. तसंच आपल्या लाडक्या बहिणीचा डेट करणाऱ्या आयुषशी सलमानची पहिली भेट कशी झाली वाचा.

आयुष शर्मा त्याच्या प्रामाणिकपणामुळे सलमान खानच्या पसंतीस पडला होता. खान कुटुंबाच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आयुष अर्पिताला भेटायला आला होता. तेव्हा दोघंही एकमेकांना डेट करत होते. रात्री दीड वाजता अर्पिताने आयुषला बिरयानी खायची का? असं विचारलं.

अर्पिता- आयुष दोघंही टीव्हीसमोर बसून बिर्यानी खात होते. तेव्हा आयुषला सलमान खान कधीही येईल अशी भीती होती. तेव्हा अर्पिताने भाऊ कर्जतला शूटिंगसाठी गेला असल्याचं सांगितलं. मात्र काही वेळाने अचानक सलमान घरी आला.

सलमानने आयुषला रात्री दोन वाजता बहिणीसोबत पाहिलं. तेव्हा तो काहीच बोलला नाही. आयुषही सलमान घरी आल्याचं पाहून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सलमानने आयुषबद्दल आईला विचारलं.

काही दिवसांनी सलमानने आयुषला भेटायला बोलावलं. त्याने आयुषला काय काम करतोस? किती कमावतोस? फ्युचर प्लॅन काय आहे? असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मी काहीच काम करत नाही. वडिलांच्या पैशांवर जगतो. पण अर्पिताशी लग्न करायचं आहे हे सांगितलं.

आयुषचा प्रामाणिकपणा बघून सलमानने अर्पिताला 'कुठून पकडून आणलंस याला? इतका कसा प्रामाणिक? खूपच खरं बोलतो असं विचारलं आणि होकार देऊन काही दिवसांनी दोघांचं थाटात लग्नही लावून दिलं.

आयुषला वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत लग्न करायचं होतं. मात्र त्याला अर्पिताला गमवायचं नसल्याने त्याने २३ व्या वर्षीच लग्न केलं. सध्या आयुष बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहेत. त्यांना 2016 साली अहिल आणि 2019 साली आयत ही मुलगी झाली.