पतौडी असूनही 'नवाब' शब्द लावू शकत नाही सैफ अली खान, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:25 PM2023-08-16T15:25:23+5:302023-08-16T15:44:23+5:30

सैफ अली खानने दोन वर्ष जाहिरात फर्ममध्येही नोकरी केली कारण...

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. नवाब परिवारात त्यांचा जन्म झाला आहे. आपल्या पतौडी पॅलेसमुळे तो कायम चर्चेत असतो. तसंच १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंगशी पहिलं लग्न, तर ११ वर्षांनी लहान करिना कपूरशी दुसरं लग्न यामुळे सैफचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं.

सैफने वयाच्या २० व्या वर्षी अमृता सिंगशी लग्न केले होते. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. तेव्हा अमृता ३२ वर्षांची होती. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुलं झाली. साराने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तर इब्राहिमही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतो.

लग्नाच्या १३ वर्षांनंतर सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. तेव्हा त्यांचा घटस्फोट सर्वात जास्त चर्चेत राहिला. यानंतर दोन्ही मुलं अमृतासोबत राहू लागली तर सैफचं फिल्मी करिअर सुरुच होतं. घटस्फोटानंतर सैफचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं.

सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला तेव्हा सारा १० वर्षांची तर इब्राहिम ४ वर्षांचा होता. असं म्हणतात की अमृताच्या बदलणाऱ्या वर्तनामुळे सैफ त्रासलेला होता. याच कारणामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सैफला सबा आणि सोहा या दोन बहिणी आहेत. नवाबांच्या कुटुंबात जन्माला आले असूनही त्यांना सामान्य पद्धतीनेच वाढवलं गेलं. नोकर चाकर असल्याने मुलं बिघडू नये असं सैफचे वडील मन्सूर अली खान यांना वाटायचं. त्यांना नेहमी सैफ अली खानबद्दल चिंता वाटायची. ते त्याला अभ्यास करण्यासाठी खूप मागे लागायचे. सैफ ९ वर्षांचा असतानाच त्याला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

सैफ ऑक्सफोर्ड आणि केंब्रिजमध्ये घेतलेल्या प्रवेश परिक्षेत पहिला आला होता. मात्र सैफ प्रवेश न घेताच भारतात परतला. यानंतर त्याने दिल्लीत एका जाहिरात फर्ममध्ये दोन महिने नोकरी केली. एकदा तर त्याला अमृता सिंहकडून १०० रुपये उसने मागण्याची वेळ आली होती. अखेर १९९३ साली त्याने 'परमात्मा' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफने कपूर परिवारातील अभिनेत्री करिनाशी लग्न केले. हे बॉलिवूडमधलं सुपरहिट कपल आहे. 'टशन' सिनेमाच्या शूटवेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

सैफ अली खान पतौडी खानदानातील १० वा नवाब आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या जन्मानंतर एकाच वर्षात पतौडीचं राज्य बंद करण्यात आलं. यासोबतच नवाब हे टायटल लावण्याची परवानगीही नाकारली.