कोल्हापूरच्या जावयाचं उत्साहात स्वागत, राजघराण्यातील अभिनेत्रीने शेअर केले सुंदर Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:26 IST2026-01-27T15:07:20+5:302026-01-27T15:26:00+5:30
यालाच 'घर' म्हणतात, अभिनेत्रीने दाखवली कोल्हापूरच्या घराची झलक

मनोरंजनविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यापैकी कोणी राजकीय कुटुंबातून येतात तर कोणी राजघराण्यात जन्माला आल्या आहेत.

अशीच एक अभिनेत्री जिने हिंदीत एक सुपरहिट सिनेमा दिला. शिवाय तिचा एक मराठीही सिनेमा गाजला. नंतर तिने भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजाशी लग्न केलं.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी आणि अभिनेत्री अशी ओळख असलेली ही आहे सागरिका घाटगे. ती कोल्हापूरच्या राजघराण्यात जन्माला आली आहे.

जहीर आणि सागरिकाच्या लग्नाला ९ वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षी त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मुलगा झाला. त्याचं नाव फतेह सिंह खान असं ठेवण्यात आलं.

नुकतंच सागरिका पती जहीर खान आणि लेकाला घेऊन कोल्हापूरच्या घरी पोहोचली. त्यांच्या रॉयल पॅलेसची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.

कोल्हापूरच्या घरात त्यांचं छान स्वागत झालं. छोट्या फतेहसाठी फुगे दिसत आहेत. तर लेक आणि जावयाच्या स्वागतासाठी फुलांची छान सजावटही केलेली दिसत आहे.

आणखी एका फोटोत सागरिकाची आई नातवाला कडेवर घेऊन फेरफटका मारत आहे. त्याला गाडीवर बसवून खेळवत आहेत.

सागरिका, जहीर आणि फतेहचे फोटोही खूप क्युट आले आहेत. समोर त्यांचे दोन पाळीव श्वानही आहेत. फतेह त्यांच्याकडे कौतुकाने पाहताना दिसतोय.

घरासमोरील बागेत मायलेकाचा हा छानसा फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. उंच झाडं, ऊन आणि हिरवीगार जागा या सान्निध्यात सागरिका लेकासोबत क्वॉलिटी वेळ घालवत आहे.

















