रामचरणच्या पत्नीला पाहिलंत? सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर; लवकरच होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:11 IST2022-12-24T14:36:44+5:302022-12-24T16:11:43+5:30
लग्नाच्या १० वर्षानंतर रामचरण आणि त्याची पत्नी आई-बाबा होणार आहेत. उपासना सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही मागे टाकते.

सध्या बॉलिवूडवर साऊथ स्टार्सचा बोलबाला आहे. अलीकडच्या RRR चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरू असताना, चाहते या चित्रपटातील अभिनेता रामचरणचे कौतुक करताना थकत नाहीत.(फोटो इन्स्टाग्राम)
लवकरच रामचरण बाबा होणार आहे. त्याची पत्नी उपासना प्रेग्नेंट आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे चाहते त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
उपासना सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते. रामचरणप्रमाणेच त्याची पत्नीदेखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. (फोटो इन्स्टाग्राम)
रामचरण आणि उपासना कामिनेनी यांचं लव्हमॅरेज आहे. त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कॉलेज जीवनापासून झाली.(फोटो इन्स्टाग्राम)
उपासना आणि रामचरण यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (फोटो इन्स्टाग्राम)
रमचरणचा 'मगधीरा' प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करु लागले. १२ जून २०१२ मध्ये रामचरण आणि उपासना या दोघांचं थाटात लग्न झालं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांच्यातील प्रेम यत्किंचितही कमी न झाल्याचं पाहायला मिळतं.त्यानंतर आता हे दोघेही नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
उपासना, रामचरणप्रमाणेच स्वतंत्र व्यवसाय करत असून ती प्रसिद्ध बिझनेस वूमन असल्याचं सांगण्यात येतं. (फोटो इन्स्टाग्राम)
उपासना एक यशस्वी इंटरप्रन्योर आहे. तसंच ती अपोलो लाइफची व्हॉइस प्रेसिडेंट आणि बी पॉझिटिव्ह मॅगझीनची एडिटर इन चीफदेखील आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
उपासनाने लंडनमधील regent युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल बिझनेस मार्केटिंग अँण्ड मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)