सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे हे फोटो इंस्टाग्रामवर आहेत खूप पॉप्युलर, पहा तिचे हे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 14:17 IST2020-08-31T14:17:14+5:302020-08-31T14:17:14+5:30

रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे सातत्याने चर्चेत येत आहे.
सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सीबीआयच्या सांगण्यावरून रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पोलीस सुरक्षा दिली आहे.
रियावर सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच रियावर सुशांतचे पैसे बळकवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सीबीआयने रियाशी सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये शुक्रवारी चौकशी केली होती.
रियाची आजदेखील सीबीआय चौकशी करत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयच्या सांगण्यावरून आम्ही रियाला सुरक्षा देत आहोत.
रियाने नुकतेच सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सांगितले होते की तिला व तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे.
रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिच्या वडिलांना इमारतीबाहेर मीडियाने घेरले होते.