साधी, सोज्वळ दिसणारी 'तेरे नाम'मधली निर्जला आठवतेय ना! आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:14 IST2025-07-14T18:10:33+5:302025-07-14T18:14:22+5:30

Bhumika Chawla : 'तेरे नाम'मधील निर्जला सर्वांना आठवत असेल. या चित्रपटाद्वारे भूमिका चावलाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली.

तेरे नाममधील निर्जला सर्वांना आठवत असेल. या चित्रपटाद्वारे भूमिका चावलाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली.

भूमिका चावलाने २००३ मध्ये 'तेरे नाम' चित्रपटातून पदार्पण केले. तिने तिच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वांना वेड लावले. निर्जलाच्या भोळ्या आणि निरागस भूमिकेने तिने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले.

तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरही ठरला. पण त्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम केला.

'तेरे नाम' या चित्रपटातून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पण त्याआधी तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात साउथ सिनेइंडस्ट्रीतून केला. २००० मध्ये 'युवाकुडू' या चित्रपटाद्वारे तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला.

तिने दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आपली ओळख निर्माण केली. तिने 'रन', 'सिलसिले', 'गांधी माय फादर', 'दिल जो भी कहे' आणि 'दिल ने जिसे अपना कहा' यासह बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्येही काम केले.

हिंदी आणि चित्रपटसृष्टीतील तिच्या यशस्वी कारकिर्दीनंतर तिने २००७ मध्ये भरत ठाकूरशी लग्न केले. त्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देण्याचा विचार केला आणि सिनेइंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केले. ती तिचा सर्व वेळ कुटुंब आणि तिच्या मुलासोबत घालवत आहेय

सलमान खानच्या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. २०२३ मध्ये ती 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटात दिसली. पुन्हा एकदा तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

याशिवाय, ती कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटातही दिसली होती. तिच्या पुनरागमनाने चाहते खूप आनंदी आहेत. भूमिका चावलाला अधिक प्रोजेक्टमध्ये पाहण्याची चाहत्यांची मागणी आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, ती १५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.