"भगवान शंकर पर्वतांमध्ये चालत होते अन्...", रवी किशन यांचा मोठा दावा, सांगितला विलक्षण अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:53 IST2025-01-24T12:42:05+5:302025-01-24T12:53:23+5:30

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांनी १९७१ सालचा 'युद्ध' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगत एक किस्सा शेअर केला.

रवी किशन हे सिने इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी, भोजपुरी आणि साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांनी १९७१ सालचा 'युद्ध' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगत एक किस्सा शेअर केला.

रवी किशन यांनी कॅमेरा ७ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मनालीच्या पर्वतरांगांमध्ये भगवान शंकराचं खरंखुरं दर्शन घडल्याचा दावा केला आहे.

"मला आठवतंय मी मनोज वाजपेयी, मानव कौल, पियुष मिश्रा यांच्यासोबत मनालीमध्ये शूटिंग करत होतो. आम्ही संपूर्ण रात्रभर शूटिंग केलं".

"पहाटेचे काही सीन शूट करायचे असल्याने आम्ही सकाळपर्यंत शूटिंग करत होतो. सूर्योदय व्हायची आम्ही वाट पाहत होते."

"आमच्या आजूबाजूला सर्वत्र बर्फच बर्फ होता. जेव्हा मी माझा सीन देत होतो तेव्हा मी पर्वतरांगांमध्ये पाहिलं आणि मला भगवान शंकर दिसले".

"मी भगवान शंकरांना पर्वतरांगांमध्ये चालताना पाहिलं. त्यांची शरीरयष्टी विशाल होती."

"माझ्या बाजूला मनोज वाजपेयी आणि दीपक डोबरियाल होते. मी त्यांनाही दाखवलं. त्यांनी पाहिलं की नाही मला माहित नाही. किंवा मी काहीतरी वेगळं पाहिलं असेल".

"पण, मला भगवान शंकर दिसले होते. मी त्यांना चालताना पाहिलं होतं."