Raveena Tandon Daughter : पद्मश्री पुरस्काराच्या आनंदात रवीनाची पार्टी, लेक 'राशा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:07 PM2023-02-08T17:07:30+5:302023-02-08T17:15:35+5:30

बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडनने दिली खास पार्टी, १७ वर्षांची लेक राशाला बघितलंत का? आईसारखीच आहे सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त तिने फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसोबत आनंद साजरा केला. रवीनाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रवीनाचा आनंद सध्या आनंद गगनात मावेनासा झालाय. ४८ वर्षीय रवीनाला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये रवीना खूपच सुंदर दिसत आहे. हातात फुगे घेऊन ती हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

या पार्टीतील फोटोजमध्ये सर्वांचेच लक्ष रवीनाच्या लेकीवर जात आहे. रवीनाची मुलगी राशा १७ वर्षांची असून ती आणि तिच्या मैत्रिणीही पार्टीत चांगल्याच एंजॉय करताना दिसल्या.

राशाने धीरुभाई अंबानी शाळेतून शिक्षण घेतलं आहे.तिला गाण्याचीही आवड आहे. इतकंच नाही तर तिने तायक्वांदोचेही प्रशिक्षण घेतले आहे. रवीना प्रमाणेच राशाही खूपच सुंदर दिसते.

राशाचे पूर्ण नाव राशाविशाखा थडानी आहे. राशाचा अर्थ पावसाचा थेंब आणि विशाखाचा अर्थ भगवान शिव आहे. रवीनाने पाठीवर राशाचे नावाचा टॅटू बनवला आहे.

राशाला म्युझिक आणि डान्समध्ये इंटरेस्ट आहे.मात्र तिला अभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त रस आहे.

रवीनाला एक मुलगाही आहे ज्याचे नाव रणबीरवर्धन थडानी आहे. त्याचा जन्म २००८ मध्ये झाला तर रवीनाने लग्नाआधीच दोन मुलींना दत्तक घेतले होते.

रवीनाने फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत २००४ मध्ये लग्न केले. उदयपुरच्या जग मंदिर पॅलेस येथे त्यांनी लग्नगाठ बांधली.