माय लेकींचा विषय लय हार्ड! रवीना टंडन आणि राशाचं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:46 IST2024-09-09T13:40:52+5:302024-09-09T13:46:50+5:30

Raveena Tandon And Rasha Thadani : रवीनाची मुलगी राशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी चर्चेत येत असते.

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही तितकीच सुंदर दिसते.

इतके दिवस रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतरही रवीनाच्या सौंदर्यात, फिटनेसमध्ये आणि स्टाइलमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

रवीनाची मुलगी राशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी चर्चेत येत असते.

रवीना टंडन तिची मुलगी राशासोबत अनेक वेळा स्पॉट होते. फिल्मी दुनियेतील कोणत्याही प्रसंगी ती तिच्यासोबत हजेरी लावते.

अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर राशासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये या आई-मुलीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

रवीना आणि राशाने ब्लॅक आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

मायलेकींनी ट्रेडिशनल ड्रेसमध्ये केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे.

राशाने काळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसते आहे, तर रवीना त्याच रंगाच्या सूटमध्ये तिचे स्टाइल स्टेटमेंट फ्लाँट करताना दिसते.

त्यांचे फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने 'तुमच्या दोघांना तोड नाही' अशी कमेंट केली. दुसऱ्याने लिहिले, 'बॉलिवूडची सर्वात सुंदर आई-मुलगी जोडी.'