वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू, अमिताभ बच्चन यांना बसला होता जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:22 IST2025-03-29T15:26:47+5:302025-03-29T16:22:13+5:30
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि सर्वांना धक्का बसला

४ डिसेंबर २००९ ला 'पा' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली. सिनेमातील एका अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.
'पा' सिनेमात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. सिनेमातील एका अभिनेत्रीचा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मृत्यू झाला
ही अभिनेत्री म्हणजे तरुणी सचदेव. १४ मार्च १९९८ ला तरुणीचा जन्म झाला. लहान वयातच तरुणीने अनेक लोकप्रिय जाहिरींमध्ये काम केलं.
'रसना', 'कोलगेट', 'रिलायंस मोबाईल', 'गोल्ड विनर', 'शक्ती मसाला' अशा जाहिरातींमध्ये तरुणीने काम केलं. तरुणीला 'रसना गर्ल' म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली.
१४ मे २०१२ ला तरुणीचा वाढदिवस होता. त्यावेळी तरुणी आईसोबत नेपाळला जात होती. परंतु दुर्दैवाने ती प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात तरुणी आणि तिची आई दोघांचा मृत्यू झाला
'आय लव यू रसना' म्हणणाऱ्या तरुणीचं जाणं सर्वांना चटका लावणारं ठरलं. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या बातमीचा जबर धक्का बसला.
तरुणीने अमिताभ यांच्यासोबत 'पा' सिनेमात केलं होतं. "देवा ही बातमी खरी नसावी", अशा शब्दात बिग बींनी त्यांचा शोक व्यक्त केला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तरुणीने जगाचा निरोप घेतला.