बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:31 IST2020-06-22T16:17:34+5:302020-06-22T16:31:20+5:30
बॉलिवूडमध्ये या जोड्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. आज या लोकप्रिय कलाकारांचे लग्नाचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अंजू महेंद्रूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुपरस्टार राजेश खन्ना यांनी स्वत:पेक्षा 16 वर्षे लहान डिम्पल कपाडियासोबत लग्नगाठ बांधली होती. असे म्हणतात की, राजेश खन्ना मुद्दाम आपली वरात अंजू महेंद्रूच्या घरासमोरून घेऊन गेले होते.
अमिताभ व जया बच्चन हे बॉलिवूडचे एक आदर्श कपल मानले जाते. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.
दिलीप कुमार सायरा बानो हेही बॉलिवूडचे एक आदर्श कपल. सायरा बानो यांनी 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते.
धर्मेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न म्हणजे बॉलिवूडचे एक चर्चित लग्न. धर्मेन्द्र यांचे हेमा सोबतचे हे दुसरे लग्न होते. 2 मे 1980 रोजी हे लग्न पार पडले होते.
ऋषी कपूर व नितू सिंग यांनी 22 जानेवारी 1980 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऋषी कपूर आज या जगात नाहीत.
बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवीने 1996 साली निर्माता बोनी कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती.
5 जून 1987 रोजी जॅकी श्रॉफ यांनी आयशा दत्तसोबत विवाह केला.
शाहरूख खानने त्याची कॉलेजची मैत्रिण गौरीसोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी शाहरूख आजच्यासारखा स्टार नव्हता.
आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तसोबत लग्नगाठ बांधली होती. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
1991 साली सैफ अली खानने अमृता सिंगसोबत गुपचून लग्न केले होते. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
1999 साली अजय देवगण व काजोल लग्नबंधनात अडकले होते.
2007 मध्ये अभिषेक बच्चन व ऐश्वर्याचा जंगी विवाह सोहळा पार पडला होता.
अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाने 2001 साली लग्न केले होते.
हृतिक रोशन व सुजैन यांनी 20 डिसेंबर 2000 साली लग्न केले. मात्र 2014 साली त्यांनी घटस्फोट घेतला.
आर माधवनने जून 1999 मध्ये सरितासोबत लग्न केले.