IN PICS : या गोष्टीमुळे अनेकजण उडवायचे राणी मुखर्जीची खिल्ली, फक्त या व्यक्तिने दाखवला होता विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 01:02 PM2021-03-21T13:02:33+5:302021-03-21T13:17:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज 43 वर्षाची झाली. आज तिचा वाढदिवस.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज 43 वर्षाची झाली. आज तिचा वाढदिवस. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्थात हे सोपे नव्हते. कारण तिचा आवाज. शिवाय उंची.

होय, करिअरच्या सुरुवातीला आवाजामुळे राणीला बराच संघर्ष करावा लागला. सुरूवातीच्या करिअरमध्ये उंची आणि आवाज यावरून राणीला बरीच टीका व नकार पचवावी लागली. राणीचा आवाज खूप विचित्र आहे, असे मेकर्सला वाटत होते.

बॉलिवूडमध्ये पदार्पणावेळी राणीचा आवात त्या काळच्या आदर्श अभिनेत्रीच्या आवाजाप्रमाणे नाजूक नव्हता. तिच्या या ओरिजनल आवाजावर अनेक मेकर्स नाखूश होते. याचमुळे अनेक सिनेमात तिचा आवाज डब करण्यात आला होता.

‘गुलाम’ या सिनेमाच्या वेळचा किस्सा राणीने अनेक मुलाखतीत सांगितला आहे. या सिनेमातही राणीचा आवाज डब करण्यात आला होता.

राणीच्या आवाजावर ना ‘गुलाम’च्या दिग्दर्शकाला विश्वास होता, ना आमिर खानला. त्यामुळे सिनेमात राणीचा आवाज डब केला गेला होता. पण या डबिंग आर्टिस्टचा आवाज राणीला अजिबात आवडला नव्हता.

पुढे काळ बदलला आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात राणीला काम करण्याची संधी मिळाली. करण जोहरने राणीच्या आवाजावर पूर्ण विश्वास ठेवला. या सिनेमात पहिल्यांदा राणीचा ओरिजनल आवाज वापरण्यात आला.

विशेष म्हणजे,‘कुछ कुछ होता है’मधील राणीचा लुक्स हिट झाला, तसाच तिचा आवाजही हिट झाला. ‘कुछ कुछ होता है’मधील राणीचा आवाज ऐकून आमिर खानही थक्क झाला होता.

जो आवाज आमिरला आधी आवडला नव्हता, त्याच आवाजाच्या आमिर प्रेमात पडला होता. यानंतर आमिरने राणीला फोन करत, तिच्या आवाजाची प्रशंसा केली होती.

इतकेच नाही तर ‘गुलाम’ सिनेमात तिच्या आवाजाबद्दल अविश्वास दाखवल्याबद्दल माफीही मागितली होती.

सन 1997 मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

21 एप्रिल 2014 रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. 9 डिसेंबर 2015 रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.