Photos: दुर्गापूजेसाठी मुखर्जी बहिणींचा बंगाली लूक! बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 17:02 IST2023-10-24T16:56:53+5:302023-10-24T17:02:55+5:30
दुर्गापूजेला राणी मुखर्जी आणि काजोलने वेधलं लक्ष

दरवर्षी नवरात्रोत्सवाला जुहू येथील नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पंडालमध्ये देवी बसवण्यात येते. बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रिटी काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) या पूजेसाठी दररोज हजेरी लावतात.
नवरात्रोत्सवात दोघी बहिणींच्या लुकची आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीची चर्चा असते. वर्षातून काहीशा एकदाच या नवरात्रोत्सवानिमित्ताने या दोघी बहिणी एकत्र येतात. यंदाही त्यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले आहेत.
काजोलसोबतच त्यांची आणखी एक चुलत बहीण शरबानी मुखर्जीनेही माध्यमांसमोर पोज दिल्या. मुखर्जी बहिणी हे नऊ दिवस पारंपारिक लुक करतात. यात त्यांचं लुक आणखी खुलतं.
कपाळी कुंकू, केसांचा अंबाडा त्यावर गजरा, लाल बांगड्या असा त्यांचा टिपिकल पारंपारिक लुक असतो. यावेळी काजोलसोबत तिचा मुलगा युगही दिसला.
यंदा मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेला कतरिना कैफ, कियारा अडवाणी, शर्वरी वाघ, राजकुमार राव, पत्रलेखा, रुपाली गांगुली, जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावली.
तर जया बच्चन यांनीही एक नाही तर सलग तीन दिवस दुर्गा पूजेसाठी हजेरी लावली. यावेळी काजोल, राणी मुखर्जी यांच्यासोबत जया बच्चन यांचा बाँड दिसून आला.
गेल्या वर्षी बॉलिवूडमधील मोस्ट पॉवरफुल कपल रणबीर कपूर-आलिया भट दुर्गापूजेसाठी आले होते. यावर्षी मात्र ते गायब होते. तसंच त्यांचा मित्र आणि काजोल-राणीचा चुलत भाऊ दिग्दर्शक अयान मुखर्जी यंदा दिसला नाही.