'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीचं 'त्या' एका फोटोमुळे बर्बाद झालं करिअर, आता ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:00 AM2023-02-17T06:00:00+5:302023-02-17T06:00:00+5:30

Actress Mandakini : 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते.

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते. या चित्रपटातून नवोदित मंदाकिनीला इंडस्ट्रीत एका रात्रीत स्टार बनवले.

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील तिचा अभिनय तर सर्वांना आवडला. मात्र यातील काही सीन्समुळे ती कायमच चर्चेत राहिली. मध्यंतरी चित्रपटातील बोल्ड सीन्सवेळी तिचे शोषण झाल्याचा खुलासा देखील तिने केला होता.

मंदाकिनी एकेकाळची बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री होती. पण तिची एक चूक तिच्या अंगाशी आली आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेले तिचे करिअर बर्बाद झाले.

एका फोटोने चांगलीच खळबळ उडवून दिली. या फोटोने प्रेक्षकांच्या मनात मंदाकिनीविषयी असलेली इमेज खराब झाली.

राम तेरी गंगा मैली चित्रपटातून मंदाकिनी चांगलीच प्रसिद्ध झाली. पण इतकी सुंदर अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीपासून दूर का गेली असा प्रश्न अनेकांना पडला. पण एका व्हायरल फोटोनं मंदाकिनीच्या आयुष्यात वादळ आले.

तो फोटो होता अभिनेत्री मंदाकिनी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा. दाऊद इब्राहिमबरोबर मैत्री करणे ही मंदाकिनीच्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती असे बोलले जाते. दाऊदबरोबरच्या मैत्रीमुळे मंदाकिनीचे करिअर धोक्यात आले.

१९९४ मध्ये दुबईच्या क्रिकेट स्टेडिअमध्ये दाऊद इब्राहिमबरोबर मंदाकिनी स्पॉट झाली. तिथला दोघांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. हा फोटो केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाही तर संपूर्ण देशात व्हायरल झाला होता. याचा परिणाम अखेर मंदाकिनीच्या करिअरवर झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, दाऊद मंदाकिनीच्या सौंदर्यावर फिदा होता. तो मंदाकिनीला त्याच्या आयुष्याची जोडीदार करू इच्छित होता. मंदाकिनीला सिनेमात काम मिळावे यासाठी तो लोकांना धमक्या देऊ लागला. याच कारणामुळे मंदाकिनीला कोणी काम द्यायला तयार नव्हते.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिमचे नाव जोडले गेले होते. तेव्हा अभिनेत्री मंदाकिनीची देखील चौकशी करण्यात आली होती. २०१० मध्ये एका मुलाखतीत मंदाकिनीने सांगितले होते की, 'दाऊद इब्राहिमबरोबर तिचे नाते होते. तो तिचा भूतकाळ होता. यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला होता'.

मंदाकिनीने 'राम तेरी गंगा मैली' बरोबरच 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करके देखो' अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.