धबधब्याखाली बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीच्या सुनबाईंना पाहिलंय का? अभिनेत्री नसूनही बोल्डनेसमुळे येते चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 10:31 IST2022-06-03T10:27:08+5:302022-06-03T10:31:42+5:30
Mandakini:मंदाकिनीच्या लेकीला अनेकांनी पाहिलं आहे. मात्र, यावेळी तिच्या सुनेची चर्चा होताना दिसते.

'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट आणि अभिनेत्री मंदाकिनी हिने धबधब्या खाली दिलेले बोल्ड सीन कोणीही विसरणं शक्य नाही.
राम तेरी गंगा मैली हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. इतकंच नाही तर या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात फेमस झाली होती.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्ष झाली. या वर्षांमध्ये मंदाकिनीचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र, तिची चर्चा वरचेवर सोशल मीडियावर होत असते.
सध्या मंदाकिनी तिच्या कुटुंबामुळे चर्चेत येत आहे. मंदाकिनीला एक मुलगा व एक मुलगी आहे.
मंदाकिनीच्या लेकीला अनेकांनी पाहिलं आहे. मात्र, यावेळी तिच्या सुनेची चर्चा होताना दिसते.
मंदाकिनीचा मुलगा रब्बिल ठाकूर याची पत्नी बुशरा बट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
बुशरा एक मॉडेल असून निर्मातीदेखील आहे. तसंच ती नेटफ्लिक्ससाठी कंटेंट प्रोड्यूस करते.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली बुशरा प्रचंड ग्लॅमरस असून तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
बुशरा विदेशात स्थायिक आहे. त्यामुळे येथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बुशराला पर्यटनाची विशेष आवड असून ती वेगवेगळ्या स्थळांना भेट देत असते.
बुशराने अलिकडेच एका फोटो शेअर केला होता. यात ती ट्रेकिंगला गेल्याचं पाहायला मिळालं.
ग्लॅमरस दिसण्याप्रमाणेच बुशरा खऱ्या आयुष्यात बोल्डदेखील आहे. अनेक अँडव्हेंचर गोष्टी तिला करायला आवडतात.