PHOTOS: राजेश खन्ना यांची नात आणि अमिताभ यांचा नातू एकत्र, तिच्या ग्लॅमरस अदांची होते चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:19 IST2025-02-13T16:00:52+5:302025-02-13T16:19:27+5:30

आणखी एक स्टार किड ठोठावतेय बॉलिवूडचं दार

बॉलिवूडमध्ये (Bollywood ) आणखी एक स्टार किड रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची नात (Rajesh Khanna's Granddaughter Naomika Saran) सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

आजोबा राजेश खन्ना, आजी डिंपल कपाडिया, काका आणि मावशी अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना आई रिंकू यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता नाओमिका (Naomika Saran) ही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

नाओमिका ही राजेश खन्ना यांची धाकटी मुलगी रिंकी खन्नाची मुलगी आहे. रिंकी खन्नानं काही चित्रपटांमध्ये काम केलं. पण, करिअर यशस्वी होऊ शकलं नाही.

रिंकी खन्नाचं लग्न बिझनेसमन समीर सरनशी २००३ साली लग्न झालं होतं.

नाओमिका ही रिंकी खन्ना आणि उद्योगपती समीर सरन यांची धाकटी मुलगी आहे. म्हणजे ती ट्विंकल आणि अक्षय कुमारची भाची आहे.

नाओमिका तिचा मावसभाऊ आरव भाटिया, जो अक्षय आणि ट्विंकलचा मुलगा आहे, त्याच्या खूप जवळ आहे.

नाओमिका ही अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत रोमँटिक कॅामेडी चित्रपटातून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

नाओमिकाचा हा पहिलाच चित्रपट असेल, तर अगस्त्यने झोया अख्तरच्या 'द आर्चिज'द्वारे सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे. 'इक्कीस'मध्ये तो धर्मेंद्र आणि जयदीप अहलावतसोबत दिसणार आहे.

नाओमिका हिचं अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण झालेलं नाही. पण, तिच्या ग्लॅमरस अदांची चर्चा सुरू झाली आहे.

नाओमिका ही आपली आई रिंकी, मावशी ट्विंकल तर आजी डिंपल यांच्यासारखीच सुंदर दिसते.