राजेश खन्नाचं मृत्यूपत्र वाचून काय म्हणाली होती डिंपल, कुणाला दिली होती कोट्यावधीची संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 02:45 PM2023-02-27T14:45:12+5:302023-02-27T14:55:27+5:30

Rajesh Khanna : राजेश खन्नाने डिंपल कपाडियासोबत लग्न केलं तेव्हा त्यांच्यात वयाचं खूप अंतर होतं. डिंपल तेव्हा 16 किंवा 17 वर्षांची असेल.

राजेश खन्ना (Rajesh Khanna) बॉलिवूडमधील कदाचित एकुलता असा स्टार आहे ज्याच्याबाबत खूप जास्त चर्चा झाली आणि आताही होतीये. राजेशच्या अदांवर तरूणी फिदा होत्या. त्याची पांढरी कार त्या लिपस्टिकने लाल करत होत्या. असं खूप काही सांगितलं जातं.

हे खरंच आहे की, त्यावेळी राजेश खन्नासारखी फॅन फॉलोईंग कुणाचीच नव्हती. राजेश खन्नाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ज्यातून त्याने अमाप संपत्ती कमावली. पण खाजगी जीवनात त्याला खूप समस्या होत्या. डिंपल कपाडियासोबत त्याचं वैवाहिक जीवन फार काही खास नव्हतं.

राजेश खन्नाने डिंपल कपाडियासोबत लग्न केलं तेव्हा त्यांच्यात वयाचं खूप अंतर होतं. डिंपल तेव्हा 16 किंवा 17 वर्षांची असेल. त्यामुळे काही दिवस गेल्यावर त्यांचं बिनसलं. पण लोकांना डिंपल कपाडिया जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी मानत होते.

राजेश खन्ना आणि डिंपल यांना दोन मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना आहेत. पण परिवार वेगळा झाला. काही वर्षातच डिंपल राजेशपासून वेगळी राहत होती. दरम्यान राजेश खन्नाचं स्टारडमही कमी होत होतं.

अमिताभ बच्चनचा काळ सुरू झाला होता. काही राजेश खन्नाचा अकडूपणा, आपल्या मनासारखं जगण्याचा अंदाज यामुळे त्याची नाती तुटत होती आणि सिनेमेही फ्लॉप होत होते. त्यानंतर हे सहन करू शकला नाही आणि डिप्रेशनमध्ये राहू लागला. 2011 मध्ये तो खूप आजारी झाला आणि बेडवरच होता. चेकअप केलं तर त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला..

वेळ निघून जात होती. कॅन्सर त्याला आतून पोखरत होता. असं सांगतात की, शेवटच्या दिवसांमध्ये राजेश खन्ना काहीच बोलत नव्हता. फक्त मुली डोळ्यांसमोर असाव्या अशी त्याची ईच्छा होती.

ट्विंकल कमी येत होती कारण ती प्रेग्नेंट होती. पण रिंकी नेहमीच त्याच्या जवळ राहत होती. राजेश खन्नाला त्याची वेळी आली याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्याने मृत्यूपत्र तयार केलं.

यासिर उस्मान यांचं पुस्तक ‘कुछ तो लोग कहेंगे’ नुसार, राजेश खन्नाने डिंपलकडे पाहिलं आणि मृत्यूपत्राबाबत सांगितलं. तेव्हा डिंपल म्हणाली की, मला काहीच नकोय. जे द्यायचंय ते तुमच्या मुलींना द्या. राजेशने असंच केलं. शुद्धीवर असताना त्याने आपली सगळी संपत्ती दोन्ही मुलींच्या नावावर केली.