१८ वर्ष लहान मराठी अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहतोय 'हा' अभिनेता; म्हणाला, "लग्न का करायचं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:34 IST2025-05-18T14:22:46+5:302025-05-18T14:34:19+5:30
९ वर्षांपासून दोघंही लिव्ह इनमध्ये राहत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मनोरंजनविश्वात असे अनेक कपल आहेत ज्यांच्या वयात कमालीचं अंतर आहे. काही जोड्यांमध्ये तर अभिनेत्री या अभिनेत्यांहून मोठ्या आहेत.
एक अशी जोडी आहे जी अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहे. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नसून त्यांचा तसा विचारही नाहीए. कोण आहे हे कपल?
तर ही जोडी आहे राहुल देव(Rahul Dev)-मुग्धा गोडसे (Mugdha Godse). राहुल देव हिंदी सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा तर मुग्धा गोडसे 'फॅशन' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
राहुल देवच्या पहिल्या पत्नीचं २००९ साली कॅन्सरने निधन झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. मुग्धाला भेटल्यानंतर राहुल परत प्रेमात पडला. २०१५ साली दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
तेव्हापासून राहुल देव आणि मुग्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. राहुल आता ५६ वर्षांचा असून मुग्धा ३८ वर्षांची आहे.
एका मुलाखतीत राहुल देव म्हणाला होता की, "आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर दोघं जण एकमेकांसोबत आनंदी आहेत तर लग्न करणं गरजेचं नाही. लग्न केलं काय अन् नाही केलं काय काहीही फरक पडत नाही."
दोघांमध्ये १४ वर्षांचं अंतर आहे. यावर मुग्धा म्हणाली होती की, "मला कधीच आमच्या वयातील अंतराची जाणीव झाली नाही. तुमचं जर त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर इतर गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत."
गेल्या ९ वर्षांपासून राहुल आणि मुग्धा लिव्ह इनमध्ये राहत आहेत आणि आनंदी आहेत. त्यांच्या ९ व्या अॅनिव्हर्सीला त्यांनी व्हिडिओही शेअर केला होता ज्यात दोघंही एकदम खूश दिसत होते.