आर माधवन, अपारशक्ती खुराना स्टारर 'धोखा राऊंड डी कॉर्नर' OTT होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:27 PM2022-11-19T17:27:51+5:302022-11-19T17:27:51+5:30

साऊथ आणि बॉलिवूड स्टार आर माधवनचा धोखा राऊंड डी कॉर्नर हा चित्रपट OTT प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर माधवन, खुशाली कुमार आणि अपारशक्ती खुराना यांचा थ्रिलर चित्रपट धोका - राऊंड द कॉर्नर नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

कुकी गुलाटी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा दहशतवादी आणि एका कपलभोवती फिरते.

सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे..

माधवन आणि खुशाली कुमार यांच्यातील रोमान्स ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.