पती निक जोनास आणि लेक मालतीसह आलिशान घरात राहते देसीगर्ल, हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे प्रियंकाचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:03 IST2023-06-05T16:15:58+5:302023-06-05T17:03:38+5:30

या अलिशान घरात प्रियंका पती निक जोनास आणि लेक मालतीसह राहते.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड पासून ते हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. यानंतर अभिनेत्रीने निक जोनाससोबत लग्न केले. त्याचवेळी, त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक आलिशान घर देखील खरेदी केलं.

प्रियंका चोप्राला आज ती ज्या स्थानावर पोहोचली आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. प्रियंका आणि निकचा सुखाचा संसार सुरु आहे.

दरम्यान, प्रियंकाने तिचं आलिशान घरही तयार केलं आहे. अभिनेत्रीचे न्यूयॉर्क शहरात एक आलिशान अपार्टमेंट आहे.

प्रियांकाचा हा अपार्टमेंट डबल आहे, जे न्यूयॉर्कमधील गगनचुंबी इमारतीच्या वरच्या मजल्यावर बांधला आहे.

या अपार्टमेंटमध्ये प्रियंका पती निक आणि मुलगी मालतीसोबत राहते.

प्रियांकाचं घर अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट निवडताना, डिझाइन करताना बारकाईने विचार करण्यात आला आहे.

प्रियंकाचे घर व्हाईट कलरने सजवलं आहे. अभिनेत्रीच्या घराच्या आतील भागात बहुतेक गोष्टी व्हाईट कलरच्या आहेत.

या घरात मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. या पूलमधील अनेक फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत.

प्रियांकाच्या घरातून संपूर्ण शहर दिसतं. प्रियांका अनेकदा तिच्या घरातले फोटो शेअर करत असते.

या घरात ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या घराची किंमत १४४ कोटी रुपये इतकी आहे.