6 वर्षानंतर प्रिती झिंटाचं इंडस्ट्रीत कमबॅक; 'या' सिनेमातून करणार सनी देओलसोबत धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:03 AM2024-01-25T09:03:29+5:302024-01-25T09:09:09+5:30

Preity zinta: आमिर खान निर्मित आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमातून प्रिती कमबॅक करत आहे.

बॉलिवूडची डिंपल क्वीन अर्थात प्रिती झिंटा हिने तिच्या करिअरमध्ये असंख्य सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, गेल्या काळात तिचा इंडस्ट्रीमधील वावर कमी झाला आहे.

१९९८ मध्ये 'दिल से' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रिती झिंटाने लग्नानंतर इंडस्ट्रीपासून फारकत घेतली. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.

प्रिती पुन्हा एकदा पडद्यावर दिसावी यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्येच चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे ती अभिनेता सनी देओल याच्यासोबत कमबॅक करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रिती येत्या काळात बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. 'लाहोर 1947' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खान करणार आहे. तर दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत.

'गदर 2' च्या यशानंतर सनीच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळेच त्याच्या पदरात 'लाहोर 1947' हा सिनेमा पडला आहे. हा एक पिरियड मुव्ही असणार आहे.

नुकतंच प्रितीला २४ जानेवारी रोजी मुंबईतील एका स्टुडिओ बाहेर स्पॉट करण्यात आलं. प्रिती इथे लूक टेस्टसाठी आली होती. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, या सिनेमाच्या माध्यमातून प्रिती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

प्रितीने आतापर्यंत 'कोई मिल गया', 'वीर झारा', 'कल हो ना हो', 'दिल है तुम्हारा', 'सोल्जर', 'सलाम नमस्ते' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रितीने २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर ती लॉस एंजलिसमध्ये शिफ्ट झाली. प्रितीने दोन जुळ्या मुलांची आई सुद्धा आहे.