न्यूड फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या पूनम पांडेने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:46 PM2020-07-27T17:46:24+5:302020-07-27T17:46:24+5:30

आपल्या बोल्ड व ग्लॅमरस अदांमुळे पूनम पांडे नेहमी चर्चेत असते.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

खरेतर पूनमने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत साखरपुडा केला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सॅम बॉम्बेने जो फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात एंगेजमेंट रिंग घातलेली पहायला मिळत आहे.

अद्याप पूनम पांडेने कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. पण त्या दोघांना खूप शुभेच्छा मिळत आहे.

सॅम बॉम्बे नेहमी सोशल मीडियावर पूनमसोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.

नुकतेच पूनमला लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अटक केली होती.

पूनमने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती. 2013 साली नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जवळपास पाच चित्रपट आणि काही मालिकेत पूनमने काम केले आहे.

पूनम पांडे 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान चर्चेत आली होती जेव्हा तिने भारतीय संघ जिंकल्यावर न्यूड होणार असल्याचे सांगितले होते.