टायगर श्रॉफने गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत एन्जॉय केली लंच डेट, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:56 PM2019-04-29T19:56:07+5:302019-04-29T19:58:40+5:30

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा रविवारी गर्लफ्रेंड दिशा पटानी सोबत वांद्रे येथे लंच करण्यासाठी गेले होते. तसेही टायगरने कॉफी विथ करण शोमध्ये सांगितले होते रविवारी तो दिशासोबत डेटवर जातो.

पिंक रंगाचा टॉप व मिनी स्कर्टमध्ये दिशा खूप सुंदर व ग्लॅमरस वाटत होती.

दिशा आगामी चित्रपट भारतच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

या चित्रपटातील दिशाचे स्लो मोशन हे गाणे रिलीज झाले असून या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.

दिशा पहिल्यांदाच भारत चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफ व सलमान खानसोबत झळकणार आहे.

तर सध्या टायगर त्याचा आगामी चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयर २च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

स्टुडंट ऑफ द ईयर २ हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.