PHOTOS : लग्नानंतर Katrina Kaif नं शेअर केली गुड न्यूज, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:33 IST2022-06-28T16:28:01+5:302022-06-28T16:33:19+5:30
Katrina Kaif : कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आणि तिला पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, आता कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
वास्तविक, अभिनेत्रीने लग्नानंतरचा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट आहे 'फोन भूत'.
कतरिना कैफने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
चित्रपटाची पोस्ट शेअर करताना कतरिनाने लिहिले की, 'फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे.
कतरिना कैफने हे पोस्ट करताच तिचे चाहते या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कतरिनाचा लूक सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे.
या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे. या २२ सेकंदाच्या टीझरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावता येत नाही, मात्र स्त्री भूताची झलक नक्कीच पाहायला मिळाली आहे, त्यामुळे आता कतरिना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी भूत बनून येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.