परेश रावल यांचा मुलगाही आहे लोकप्रिय अभिनेता; ९९ % लोकांना माहितच नसेल, कोण आहे तो?
By देवेंद्र जाधव | Updated: February 24, 2026 17:01 IST2026-02-24T16:38:54+5:302026-02-24T17:01:01+5:30
बाबूभैय्या फेम परेश रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. परेश रावल यांचा मुलगाही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल

बाबूभैय्या फेम परेश रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. परेश रावल यांचा मुलगाही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल

परेश रावल यांच्या लेकाचं नाव आहे आदित्य रावल. आदित्य सध्या विविध माध्यमांत अभिनय करतो आहे. आदित्य वडिलांची ओळख न वापरता स्वतःच्या मेहनतीवर सिनेसृष्टीत स्थान निर्माण करत आहे.

आदित्य रावलने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. वडील परेश रावल यांच्याच ओह माय गॉड सिनेमासाठी आदित्यने काम केलं होतं.

पुढे आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत सिनेमासाठी आदित्यने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. याशिवाय फेरारी की सवारी सिनेमात आदित्यने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

२०२० साली आलेल्या बमफाड सिनेमात आदित्य प्रमुख अभिनेता म्हणून पहिल्यांदाच झळकला. पुढे तिरंदाज या वेब शोमध्ये आदित्यने काम केलं.

२०२३ मध्ये आलेल्या प्राईम व्हिडीओवरील बंबई मेरी जान वेबसीरिजमध्ये आदित्यने छोटा राजनची छोटीशी तरीही महत्वपूर्ण भूमिका साकारली.

एकूणच वडिलांप्रमाणे आदित्यला हवी तशी लोकप्रियता मिळत नसली तरीही छोट्यामोठ्या भूमिका साकारुन आदित्य कलाक्षेत्रात सक्रीय आहे. लवकरच तो अनिल कपूर यांच्यासह सुबेदार सिनेमात झळकणार आहे.

















