पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टा अकाउंट भारतात पुन्हा सक्रीय, पाहा कुणाचं खुलं, कुणाचे अद्याप ब्लॉक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:19 IST2025-07-02T15:37:00+5:302025-07-02T16:19:42+5:30
भारतात पुन्हा दिसू लागली पाकिस्तानी कलाकारांची इंस्टाग्राम प्रोफाइल्स, संपूर्ण यादी पाहा!

Pak celeb Insta visible India: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारताला वाईट म्हणत नावं ठेवली होती.
त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला. १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स आणि अनेक पाक कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बॅन केले.
भारतातील लोक हे पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम अकाउंट लॉक (Pakistani Celebs Instagram) केल्यामुळे पाहू शकत नव्हते. आता दोन महिन्यांनंतर काही पाकिस्तानी सेलिब्रिटींवरुन ही बंदी उठवण्यात आली आहे.
काही मोजक्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंट भारतात (Pakistani Actors Instagram Account Visible In India) पुन्हा दिसू लागले आहेत. 'सनम तेरी कसम' फेम पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसह (Mawra Hocane) इतर काही कलाकारांचा समावेश आहे.
सबा कमर (Saba Qamar) या पाकिस्तानी अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम भारतात दिसू लागलं आहे. ती पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
पाकिस्तानी-कॅनडियन अभिनेता अहद रझा मीरच्या (Ahad Raza Mir) इन्स्टाग्रामवरुन बंदी उठली आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट भारतीय चाहते पाहू शकत आहेत.
पाकिस्तानी अभिनेत्री युमना जैदी (Yumna Zaidi) हिचं देखील इन्स्टाग्राम अकाउंट भारतात दिसू लागलं आहे.
'ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पार्टी हो रही है' असं म्हणत व्हायरल झालेली अभिनेत्री दानानीर मोबीन (Dananeer Mobeen) हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बॅन हटलं आहे.
दानिश तैमूर (Danish Taimoor) हा पाकिस्तानातील एक लोकप्रिय अभिनेता, निर्माता, होस्ट आणि मॉडेल आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट भारतीय चाहते पाहू शकत आहेत.
यासोबतच पाकिस्तानी अभिनेत्री अनमोल बलोच (Anmol Baloch), लैबा खान (laiba khan), इम्रान अब्बास नक्वी (Imran Abbas) यांचेही इन्स्टाग्राम अकाउंट भारतात दिसू लागलं आहे.
पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम हँडलवरील बंदी उठवल्यानंतर भारतीय आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान काही पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंटवर अजूनही बंदी आहेत. ज्यात हानिया आमिर, फवाद खान, माहिरा खान आणि गायक आतिफ असलमसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.