हटेना हटे नैना ! नुसरत भरुचाच्या ब्रायडल फोटोशूटवर चाहते फिदा, PICS VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:51 IST2021-03-12T20:44:59+5:302021-03-12T20:51:29+5:30
Nushrat Bharucha Bridal Photoshoot: विविध स्टाईलमधील नुसरत भरुचाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत. मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळते.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी नुसरत पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
लाल रंगाचा लेहेंगा आणि ज्वेलरी एकूणच नुसरतचा हा लूक चाहत्यांना भुरळ पाडतोय.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
नुसरतने पारंपरिक वेशात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
नुसरत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
काही फोटोंमध्ये नुसरतचा निरागसपणा दिसून येतो तर काही फोटोंमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.
नुसरतचा नववधू लूक तिच्या फोटोशूटसाठी करण्यात आला होता.
एका मॅगिझिनच्या कव्हरपेजसाठी ब्रायइडल स्पेशल फोटोशूट नुसरतने केले आहे.