ग्रे गाउनमधील नोरा फतेहीच्या फोटोशूटची होतेय चर्चा, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 15:54 IST2021-04-01T15:54:51+5:302021-04-01T15:54:51+5:30

नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोत नोरा फतेही ग्रे गाउनमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडियावर नोहा फतेही कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय एक चांगली बेली डान्सर आहे. नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया.
नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.
त्यानंतर नोरा तेलगू चित्रपट टेम्परमध्ये दिसली. त्यानंतर ती तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबली मध्ये झळकली.
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर २४.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.