नोरा फतेहीचं सा़डीत सुंदर फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:46 IST2025-03-18T17:40:33+5:302025-03-18T17:46:22+5:30

'दिलबर गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
नोरानं अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नोराचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सध्या नोराने साडीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देत तिने चाहत्यांना आपल्या अदाकारिने घायाळ केलंय.
अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ती कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
नोराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नुकतंच तिचं 'स्नेक' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. जे प्रचंड लोकप्रिय झाले आहे.