नोरा फतेहीनं केलं असं फोटोशूट, तिचा अवतार पाहून ट्रोलर्स म्हणाले- ही तर स्वस्तातली लेडी गागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 18:56 IST2023-01-16T18:40:08+5:302023-01-16T18:56:10+5:30
नोराला नव्या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच नोराने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा फतेहीचे नवीन फोटोशूट चर्चेत आहे. या फोटोंमध्ये नोराने बॉडी फिट गोल्डन ब्लिज ड्रेस कॅरी केला आहे. या लूकमध्ये नोरा हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मात्र, तिचा हा नवा लूक चाहत्यांना फारसा आवडला नाही. त्यामुळे नोराला या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. (फोटो इन्स्टाग्राम)
ग्लॅमरस स्टाईलमध्ये फोटो शेअर करताना नोराने ब्राझिलियन गाण्याचे बोल लिहिले आहेत. या पोस्टवर यूजर्स नोराला खूप ट्रोल करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले- 'केस पाहून म्हातारीच्या केसांची आठवण झाली.' दुसऱ्या यूजरने लिहिले- ही कार्डी फतेही आहे. आणखी एका यूजरने लिहिले - आजकालचे लोक काहीही परिधान करतात.(फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 43.9 मिलियन लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)