Natasa Stankovic : नताशासाठी सोपं नाही कमबॅक; हार्दिकशी लग्न केल्यावर सोडलेलं करियर, म्हणाली, "५ वर्षांनंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:44 IST2025-03-27T12:38:52+5:302025-03-27T12:44:26+5:30
Natasa Stankovic : नताशाने २०१४ मध्ये 'सत्याग्रह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

नताशा स्टँकोविचला एक्टिंगमध्ये कमबॅक करायचं आहे. पण आता ते इतकं सोपं नाही हे तिने मान्य केलं आहे. नताशाने २०१४ मध्ये 'सत्याग्रह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
नताशा बिग बॉस आणि नच बलिये सारख्या रिएलिटी शोमध्येही दिसली, पण नंतर ती क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केलं. ती एका मुलाची आईही झाली.
नताशा आणि हार्दिकचं हे नातं तुटलं, त्यानंतर नताशा आता एक नवीन सुरुवात करू इच्छिते. TOI शी बोलताना ती म्हणाली की, "५ वर्षांनंतर हे सोपं नाही."
"गोष्टी हळूहळू ठीक होत आहेत. लोकांना माहित नव्हतं की, मी काम करण्यास तयार आहे. मी लोकांना समजेल येईल इतका वेळ उपलब्ध नव्हते."
"माझ्या घटस्फोटानंतर लोक म्हणू लागले की मी सर्बियाला परत गेले आहे, पण मी परत का जाऊ, माझा एक मुलगा आहे जो इथेच शाळेत जातो. हे कधीच होणार नाही."
"मी आणि हार्दिक अजूनही एक कुटुंब आहोत. आम्ही आमच्या मुलाची काळजी एकत्र घेतो. अगस्त्य माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी सर्वात आधी एक आई आहे आणि हे कधीही बदलणार नाही."
"माझं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं असं नाही. पण मला खरोखर काम करण्याची गरज होती. मुलाच्या आनंदासाठी आईने आनंदी असणं महत्वाचं आहे असं मला वाटते."
"मी कामावर परतण्याचा निर्णय घेण्यामागे हे एक कारण होतं. गेल्या पाच वर्षात मी काहीही केलं नाही याची मला खंत वाटते."
"मला आयुष्यात कोणताही पश्चात्ताप नाही कारण मला एक मूल आहे आणि मी त्याला वेळ दिला आहे."
"मी हे आधीच करू शकले असतो. एक महिला म्हणून आणि पूर्वी काम केलेली व्यक्ती म्हणून, माझ्या मानसिक आरोग्यासाठी काम करणं चांगलं झालं असतं" असं नताशाने म्हटलं आहे.