विवाहित नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत लीव्ह इनमध्ये राहात होत्या रत्ना पाठक, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 02:32 PM2021-03-18T14:32:22+5:302021-03-18T14:47:44+5:30

रत्ना पाठक यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या त्या पत्नी आहेत.

नसिरुद्दीन आणि रत्ना यांची लव्हस्टोरी प्रचंड फिल्मी आहे. त्या दोघांमध्ये 13 वर्षांचे अंतर आहे. रत्ना नसिरुद्दीन यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान आहेत.

संभोग से संन्यास तक या नाटकाच्या दरम्यान नसिरुद्दीन आणि रत्ना यांची पहिली भेट झाली. या नाटकाचे दिग्दर्शन सत्यदेव दुबे यांनी केले होते.

नसिरुद्दीन आणि रत्ना यांची पहिली भेट झाली त्यावेळी नसिरुद्धीन यांचे लग्न झालेले होते. त्यांच्या पत्नीचे नाव परवीन मुराद होते आणि त्या मुळच्या पाकिस्तानमधील होत्या.

नसिरुद्दीन त्यांची पत्नी परवीनपेक्षा 16 वर्षांनी लहान होते. त्यांना एक मुलगी देखील होती. पण रत्ना नसिरुद्दीन यांच्या आयुष्यात यायच्याआधीच त्यांच्या नात्यात प्रचंड अंतर आले होते.

नसिरुद्दीन त्यांची पत्नी परवीन काही वर्षांनी वेगळे झाले आणि परवीन आपल्या मुलीला घेऊन इराणला निघून गेल्या.

नसिरुद्दीन आणि परवीन वेगळे झाले असले तरी त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. त्यामुळे रत्ना आणि नसिरुद्दीन लग्न न करता अनेक दिवस एकत्र राहात होते.

नसिरुद्दीन आणि रत्ना यांनी 1 एप्रिल 1982 ला रत्ना यांची आई दिना पाठक यांच्या घरी लग्न केले.

नसिरुद्दीन आणि रत्ना यांना इमाद आणि विवान अशी दोन मुले आहेत.