२० वर्षांनी लहान नेपाळी अभिनेत्रीवर जडलेला नानांचा जीव, विवाहित असूनही पडलेले प्रेमात; पण दुसरीसोबतचं अफेअर नडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:04 IST2025-09-10T11:45:54+5:302025-09-10T12:04:28+5:30
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नानांचं नाव जोडलं गेलं होतं. एका नेपाळी अभिनेत्रीसोबतही नानांचं अफेअर होतं.

नाना पाटेकर हे सिनेइंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूडही गाजवलं. पण, नाना त्यांच्या लव्ह लाइफमुळे जास्त चर्चेत होते.
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नानांचं नाव जोडलं गेलं होतं. एका नेपाळी अभिनेत्रीसोबतही नानांचं अफेअर होतं.
ही अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांची पहिली भेट 'अग्नीसाक्षी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती.
२० वर्षांनी मोठ्या असलेल्या नाना पाटेकर यांच्या प्रेमात मनिषा पडली होती. नानाही मनिषावर जीवापाड प्रेम करायचे.
मनिषा आणि नानांनी संजय लीला भन्साळींच्या खामोशी सिनेमातही एकत्र काम केलं होतं. त्यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा रंगली होती.
त्यांचं प्रेम प्रकरण प्रचंड गाजलं होतं. पण, मनिषाच्या बाबतीत नाना पझेसिव्ह झाले होते. तिने इतर अभिनेत्यांसोबत इंटिमेट सीन्स दिलेले किंवा छोटे कपडे घातलेले त्यांना आवडत नव्हते.
मनीषाला नानांसोबत लग्न करायचं होतं. पण, पत्नीला घटस्फोट द्यायला ते तयार नव्हते.
मनीषाने नानांना अभिनेत्री आयशा झुलकासोबत रंगेहाथ पकडलं होतं. नाना आणि आयेशा झुलकाला एकत्र खोलीत पाहून तिला धक्का बसला होता.
यानंतर मनिषाने नाना पाटेकरांसोबत ब्रेकअप केलं. मात्र ब्रेकअपनंतरही नाना मनिषाला विसरू शकले नव्हते.
नंतर मनिषाने २०१० मध्ये नेपाळी उद्योजक सम्राट दहाल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, अवघ्या दोनच वर्षांत तिचा घटस्फोट झाला.