स्पेनच्या गॉथिक क्वार्टरमध्ये मौनी रॉयचं क्लासी फोटोशूट, पाहा दिलखेचक Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 03:18 PM2024-06-21T15:18:24+5:302024-06-21T15:29:02+5:30

मौनी रॉय ही बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने एक चाहता वर्ग निर्माण केलाय.

मौनी रॉय हिला फिरण्याची भरपूर आवड आहे. तिला नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

मौनी सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. आपल्या सोशल मीडियावर तिने याची खास झलक शेअर केली आहे.

मौनीच्या या फोटोमध्ये गॉथिक आर्किटेक्चर पाहायला मिळत आहे.

मौनी रॉय हिच्या फोटोत दिसणारं गॉथिक क्वार्टर हे बार्सिलोनाचं ऐतिहासिक केंद्र आहे.

तर मौनी ही बॉडिकॉन ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.

व्हेकेशन फोटोंमध्ये मौनी रॉयचा क्लासी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मौनी ही कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.